|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » माल्टा : खडकाळ टेकडीची प्रतिकृती निर्माण करण्याची तयारी

माल्टा : खडकाळ टेकडीची प्रतिकृती निर्माण करण्याची तयारी 

वृत्तसंस्था/ वालेटा

 माल्टाच्या समुद्रात दगडाची नैसर्गिक टेकडी भूस्खलन तसेच वेगवान वाऱयांच्या माऱयामुळे 2017 मध्ये नष्ट झाली होती. गोजो बेटामध्ये आता याच टेकडीची प्रतिकृती स्टीलच्या वापराने उभारण्याची तयारी सुरू आहे. या खडकाळ टेकडीला एज्योर विंडो रॉक म्हटले जाते. नवी प्रतिकृती रशियन स्थापत्यविशारद स्वेतोजार एंद्रीव्ह यांनी तयार केली आहे.

एंद्रीव्ह हे रशियन स्थापत्यकला कंपनी होतेई रशियाचे प्रमुख आहेत. त्यांच्या रचनेला हार्ट ऑफ माल्टा नाव देण्यात आले आहे. नव्या रचनेच्या समोरच्या बाजूला मिरर स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

ही रचना वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे. याला आधुनिकता तसेच निसर्गाचे मिश्रण देखील म्हटले जाऊ शकते. वेळ, इतिहास आणि मानवी आत्म्याच्या तपाचे वारसापत्र म्हणून देखील याकडे पाहिले जाऊ शकते, असे उद्गार एंद्रीव्ह यांनी काढले आहेत.

नवी रचना मानवनिर्मित असली तरीही ती हुबेहुब नैसर्गिक रचनेप्रमाणे निर्माण करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत भागात 5 मजले असतील आणि प्रत्येक मजल्यावर इतिहासाशी संबंधित गोष्टी सामील असणार आहेत. मजल्यांवर वळणदार जिन्यांच्या माध्यमातून जाता येईल. एंद्रीव्ह यांच्या प्रस्तावित रचनेला माल्टाची स्वीकृती मिळाली आहे. याचे चित्रण संकेतस्थळावर टाकून ऑनलाईन मतदानाद्वारे लोकांचे मत विचारात घेतले जात आहे. आतापर्यंत 68 टक्के लोकांनी हाटॅ ऑफ माल्टाच्या निर्मितीला संमती दर्शवली आहे.  लोकांच्या प्रतिसादातून प्रकल्पाचे खरे महत्त्व समजत असल्याचे एंद्रीव्ह यांनी सांगितले.

रचनेबद्दल काही असंतुष्ट

एंद्रीव्ह यांची रचना सर्वांनाच पसंत पडली असे घडलेले नाही. टाईम्स ऑफ माल्टा तसेच सांद्रो स्पीतेरी या प्रसारमाध्यमांनी हार्ट ऑफ माल्टामध्ये आमिषासोबतच अश्लीलतेची झलक दिसत असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी सरकारने प्रतिकृतीच्या जागी एका हॉटेलच्या निर्मितीचा प्रस्ताव फेटाळला होता. एज्योर विंडोच्या आठवणी जाग्या करणाऱया प्रतीकाच्या सूचनांचा मार्ग नेहमीच खुला राहणार असल्याचेही सरकारने म्हटले होते.