|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू ; कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य

गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू ; कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या सर्वणांना आरक्षण देणाऱया कायद्याची अंमलबजावणी गुजरातमध्ये आजपासून सुरू झाली आहे. सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात देशातले पहिले राज्य ठरले आहे. सोमवारपासून गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू करण्यात येईल, असे कालच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जाहीर केले होते. यानंतर आजपासून गुजरातमध्ये नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.

शनिवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सवर्णांना आरक्षण देणाऱया विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने मागील आठवडय़ात आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या सर्वणांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी याबद्दलचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यानंतर राज्यसभेतही विधेयक बहुमताने संमत झाले. यामुळे गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.