|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » 153 रूपयांत 100 टीव्ही चॅनल फ्री दाखवा : ट्रायचे निर्देश

153 रूपयांत 100 टीव्ही चॅनल फ्री दाखवा : ट्रायचे निर्देश 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टीव्हीवरील पसंतीची चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढीचा दिलासा दिलेला आहे. आज पुन्हा एकदा ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ग्राहकांना प्रति महिना 153 रूपयांत 100 चॅनेल फ्री दाखवण्याचे निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना दिले आहेत.

ग्राहकांनी टीव्हीवरील 100 चॅनेलची निवड 31 जानेवारीपर्यंत करायची आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना 153.40 रुपयांप्रमाणे शंभर चॅनेल फ्री दाखवावेत. यात जीएसटीचाही समावेश असेल, असेही ट्रायने म्हटले आहे. या शंभर चॅनेलमध्ये एचडी चॅनेलचा समावेश नसणार आहे. दोन चॅनेलसोबत एक एचडी चॅनेल निवडता येवू शकते, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी 19 रुपये मोजण्याचा आणखी एक निर्णय ट्रायने रद्द ठरवला आहे. ग्राहकांना पसंतीची चॅनेल निवड करण्याची संधी आहे. जर यासंदर्भात काही अडचण आल्यास ट्रायने फोन नंबरवर संपर्क साधण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे. advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in या दोन ईमेल आयडीवर काही तक्रार असल्यास ती नोंदवता येवू शकणार आहे, असेही ट्रायने म्हटले आहे.