|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » शिवसेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना पक्ष स्थापनेपासून सक्रीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत उर्फ बापू खेडेकर यांचे आज दुपारी एक वाजता चिपळूण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 71 वर्षांचे होते. 1966 मध्ये शिवसेना पक्ष स्थापन केला तेव्हाच बापू खेडेकर यांनी भगवा खांद्यावर घेतला तो शेवट पर्यंत कायम ठेवला.

 

चिपळूण तालुक्यात शिवसेनेचे रोपटे त्यांनी लावले.1970 मध्ये चिपळूण शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेची पहिली शाखा बापू खेडेकर आणि बंधू ठाकरे यांनी स्थापन केली. पहिल्या शाखेच्या स्थापना आणि शाखेचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे बापू खेडेकर यांच्या निवासस्थानी उतरले होते. त्यानंतर चिपळूण तालुकाप्रमुखाची जबाबदारी बापू खेडेकर यांनी उत्कृष्ट सांभाळली. 1990 साली चिपळूण विधानसभा मतदारसंघातून बापू खेडेकर विधानसभेत निवडून गेले. 1990 ते 1995 या कालावधीत शिवसेनेचे चिपळूण मतदारसंघातील पहिले आमदार ठरले. त्यानंतरही वयाच्या 71 वय वर्षापर्यंत शिवसेनेत सक्रीय होते. त्यांचा उत्साह तरूणांना लाजवणारा होता. गेले काही दिवस बापू खेडेकर आजारी होते. अलीकडेच त्यांना घरी आणण्यात आले होते.

 

Related posts: