|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या ब्रँडबरोबर श्रीकांतचा नवा करार

चीनच्या ब्रँडबरोबर श्रीकांतचा नवा करार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा माजी टॉप सीडेड आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने सोमवारी चीनच्या ली-निंग या क्रीडा पुरस्कर्त्यां उद्योगसमुहाबरोबर 4 वर्षांसाठी 35 कोटी रूपयांचा नवा करार केला आहे.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये सुपर सिरीजमधील सहा बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा किदांबी श्रीकांत हा भारताचा एकमेव बॅडमिंटनपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा साहित्याची निर्मिती करणाऱया चीनच्या ली-निंग या कंपनीशी के. श्रीकांतने चार वर्षांसाठी करार केला आहे. या करारापोटी ली-निंग या चायनीज ब्रँडकडून श्रीकांतला 35 कोटी रूपये मिळणार आहेत. चीन-इंडेनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाच्या बॅडमिंटन संघांना ली-निंगने आपला पाठिंबा दिला असून 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय पथकाचे ली-निंग हे अधिकृत पुरस्कर्ते होते. 2020 च्या टोकियो ऑलिंपिकसाठीही भारतीय संघाचे ते अधिकृत पुरस्कर्ते राहतील. 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये किदांबी श्रीकांतकडून भारताला सुवर्णपदक अपेक्षित आहे.