|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » चीनचा निचांक, 14 धावांत डाव समाप्त

चीनचा निचांक, 14 धावांत डाव समाप्त 

वृत्तसंस्था/ बँकॉक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळातर्फे (आयसीसी) जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करण्याची मोहिम हाती घेतली आहे. चीनमध्ये क्रिकेटला प्राधान्य अधिक मिळावे यासाठी आयसीसीचे प्रयत्न चालू आहेत पण चीनमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्याच्या मोहिमेला थोडा धक्का बसला आहे. बँकॉकमध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 सामन्यात चीनचा डाव केवळ 14 धावांत आटोपला. टी-20 प्रकारातील पुरूष किंवा महिलांच्या क्रिकेटमध्ये ही आजवरची सर्वात निचांकी धावसंख्या आहे.

बँकॉकमध्ये झालेल्या चीन आणि संयुक्त अरब अमिरात महिलांच्या क्रिकेट सामन्यात संयुक्त अरब अमिरातने 20 षटकांत 3 बाद 203 धावा जमविल्या. त्यानंतर चीनचा डाव केवळ तासाभरात 10 षटकांत 14 धावांत उखडला. संयुक्त अरब अमिरातची गोलंदाज लीलीने 4 गडी बाद केले. या स्पर्धेत मलेशिया, इंडोनेशिया आणि म्यानमार हे देश सहभागी झाले आहेत.