|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अधीवेशन 22 दिवसांचे करावे

अधीवेशन 22 दिवसांचे करावे 

प्रतिनिधी/ पणजी

 जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी या सरकारने व विरोधी पक्षाने फक्त 3 दिवस अधीवेशन घेण्याचा निर्णय घतला आहे. राष्ट्रीवादीचा याला विरोध असून किमान 22 दिवस अधीवेशन चालवावे, अशी मागणी राष्ट्रीवादीतर्पे करण्यात आली.

 दि. 29 ते 31 जानेवारी रोजी होणारे अधीवेशन हे किमान 22 दिवस करावे जेणेकरुन गोव्यातील सर्व मतदार संघातील समस्यांवर चर्चा करायला मिळणार आहे. फक्त तीन दिवसात महत्वाच्या विषयी अधीवेशनात चर्चा होत नाही. लोक या लोकप्रतिनिधींना पाच वर्षासाठी निवडून देतात तसेच महिन्याला त्यांना 1.77 लाख रुपये पगार असतो त्यामुळे त्यांनी किमान 22 दिवस हे अधिवेशन घ्यावे. तीन दिवसात कुठलेच विषयी अधीवेशनात मांडता होणार नाही, असे संजय बर्डे म्हणाले.

 खाण विषयी केंद सरकारने लोकांची दिशाभुल केली आहे. दिल्लीत आंदोलन करुनही त्याच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. गोव्याचा तिन्ही खासदारांनी हा विषय सोडविण्यात अपयश आले आहे. त्यांना पंतप्रधानांची भेट होत नाही. भाजपने या लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप संजय बर्डे यांनी केला.

 मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात येत आहेत पण पोलीसांकडून त्यांची फसवणूक होत असल्याने गोव्याचा चुकीचा संदेश परराज्यात जातो. पोलीसांकडून प्रत्येक ठिकाणी या पर्यटकांची तपासणी केली जाते आणी या पर्यटकांची सतावणूक केली जाते सध्या गृहमंत्री आजारी असल्याने त्यांच्यावर नियंत्रण नाही, असे संजय बर्डे &म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत नियाज शेख, सितेश मोरे व इतर उपस्थित होते.