|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » आर्थिक दुर्बल आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू होणार : जावडेकर

आर्थिक दुर्बल आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू होणार : जावडेकर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टय़ा दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.आगामी शैक्षणिक वर्षांपासून देशातील शिक्षणसंस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टय़ा दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

दरम्यान, सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात देशातले पहिले राज्य ठरले आहे. सोमवारपासून गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू करण्यात येईल, असे कालच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जाहीर केले होते. यानंतर आजपासून गुजरातमध्ये नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. प्राप्तकिर प्रमाणपत्र- वर्षाकाठी 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सवर्णाना आरक्षणाचा लाभ मिळेल. त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी प्राप्तकिर प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे प्राप्तकिर प्रमाणपत्र नसेल, तर लगेच तयार करुन घ्या. तहसील किंवा जनसेवा केंद्रात हे प्रमाणपत्र तयार करुन मिळेल. जात प्रमाणपत्र- आरक्षण मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे आहे. हेदेखील तहसील किंवा जनसेवा केंद्रात तयार करुन घेता येईल. आधार कार्ड- देशातील बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड आहे. आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज भासू शकते. त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तातडीने त्यासाठी अर्ज करा. आधारवरील नाव, पत्ता, जन्मदिनांक यासारखी माहिती अचूक आहे की नाही, याची खात्री करुन घ्या.