|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमध्ये शांततेसाठी दहशतवाद्यांशी चर्चा करा : मुफ्ती

काश्मीरमध्ये शांततेसाठी दहशतवाद्यांशी चर्चा करा : मुफ्ती 

श्रीनगर

 भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांच्या कुटुंबांना त्रास दिल्याचा नाहक आरोप केल्यावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आता दहशतवाद्यांसोबत चर्चा करण्याची मागणी केली आहे. काश्मीर खोऱयातील वाढत्या दहशतवादी घटना रोखण्यासाठी दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेतला जावा. शस्त्र उचलणारेच शस्त्रांची संस्कृती संपवू शकतात, असा अजब युक्तिवाद मुफ्ती यांनी मंगळवारी केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी केवळ फुटिरवादी हुर्रियतसोबत चर्चा करणे पुरेसे नाही. स्थानिक दहशतवादी याच भूमीचे पुत्र आहेत. त्यांना संपविण्याचा नव्हे तर वाचविण्याचा आमचा प्रयत्न असायला हवा. 2019 च्या निवडणुकीत मते प्राप्त करण्यासाठी काश्मिरींचा वापर करून राजकीय पक्ष स्वतःचे हित साधत असल्याचा आरोप पीडीपी प्रमुखांनी केला आहे.

 राष्ट्रीय पक्षांच्या या भूमिकेमुळे काश्मिरी तसेच त्यांच्या कुटुंबांना झळ बसत असल्याचा दावा मुफ्ती यांनी केला. सत्तेवरून पायउतार झाल्यापासून मुफ्ती यांचा फुटिरवाद्यांबद्दलचा कळवळा वाढला आहे.