|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मच्छिंद्र कांबळे यांच्या साहित्यामध्ये मध्यमवर्गीयांचे जीवनदर्शन

मच्छिंद्र कांबळे यांच्या साहित्यामध्ये मध्यमवर्गीयांचे जीवनदर्शन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मच्छिंद्र कांबळे यांचे साहित्य म्हणजे,मध्यमवर्गीय माणसाचे जीवनदर्शन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यप्रकाश रणभुसे यांनी केले.

मच्छिंद्र कांबळे यांच्या पहिल्या हिंदी कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कांबळे यांच्या जीवनामधील अनेक बरे-वाईट प्रसंगाचे अनुभव या कथा संग्रहामध्ये दाखवले असल्याचे सांगितले. प्रा. शशिकला सरगर यानीं उस शाममधील भावविश्व उघडून, लेखकांच्या निरीक्षण शक्तीचा परिचय करून दिला. आपण यापुर्वी आठ पुस्तके लिहीली असून, हे हिंदी कथासंग्रह नववे असल्याचे सांगितले. प्रारंभी तेजश्री कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले. तर सूत्रसंचालन सुरेश कांबळे यानीं केले. यावैळी सुशिलकुमार कोल्हटकर, अनिल म्हमाणे उपस्थित होते.