|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » केनियाच्या राजधानीत आत्मघाती हल्ला, 15 जण ठार

केनियाच्या राजधानीत आत्मघाती हल्ला, 15 जण ठार 

नैरोबी

 केनियाची राजधानी नैरोबीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. नैरोबीच्या एका हॉटेल परिसरात मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर परिसरातील सर्व इमारतींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आता तेथे कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. नैरोबीत 5 वर्षांनंतर अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला झाला आहे. हॉटेल परिसरात झालेले स्फोट आणि मोठय़ा प्रमाणावरील गोळीबारामुळे लोक स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना दिसून आले. हा आत्मघाती हल्ला पंचतारांकित हॉटेल डुस्टीडी-2मध्ये झाला आहे. या हॉटेलमध्ये अनेक स्थानिक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर याच परिसरात अमेरिका, युरोप तसेच भारताचे नागरिक मोठय़ा संख्येत राहतात. दहशतवाद्यांनी हॉटेल परिसरात कारमध्ये स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याची जबाबदारी सोमालियातील क्रूर दहशतवादी संघटना अल-शबाबने स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.

Related posts: