|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठा

इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठा 

आर.पी.डी कॉलेजतर्फे जिमखाना दिन कार्यक्रम

बेळगाव  / प्रतिनिधी

युवावर्गाने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चे ध्येय गाठावे आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवावे, असे मार्गदर्शन जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी केले.

येथील एस. के. ई. सोसायटी संचलीत आर. पी. डी. कॉलेजमध्ये आयोजित अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. त्यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते अमृतमहोत्सवी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

आर. पी. डी. पदवीपूर्व कॉलेजचा जिमखाना दिन कार्यक्रमही यानिमित्ताने साजरा झाला. या कार्यक्रमावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आपल्यातील बलस्थाने ओळखून त्यांचा योग्य वापर करा. तसेच आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी सखोल अभ्यास करून इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठा असा संदेश त्यांनी दिला.

विविध क्षेत्रात विशेष प्राविण्यासह यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अनुष्का आपटे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाले. प्रा. सविता चौगुले यांनी स्वागत केले. प्रा. सुजाता विजापुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य काशिनाथ मेळेद यांनी अहवाल वाचन केले. व्यासपीठावर व्यवस्थापन मंडळातील सदस्य पी. एम. शिवलकर, बिंबा नाडकर्णी, डी. बी. कलघटगी, एम. बी. चौका, देवेंद्र कुडची आदी उपस्थित होते.

कॉलेजमधील आदर्श विद्यार्थी म्हणून शिवाजी तिबीले, विद्यार्थीनी म्हणून रिया नाडकर्णी यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. नुपूर रानडे हीच्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. सरस्वती धरणगट्टी यांनी आभार प्रदर्शन केले.