|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बसवाण गल्ली येथे गॅस दुरुस्ती दुकानाला आग

बसवाण गल्ली येथे गॅस दुरुस्ती दुकानाला आग 

प्रतिनिधी/ बेळगाव

बसवाण गल्ली येथील गॅस, मिक्सर दुरुस्तीच्या दुकानाला आग लागून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महांतेशनगर येथील शिवानंद शिवमूर्त्याप्पा वळसंग यांनी फिर्याद दिली आहे. या आगीत दुकानातील गॅस स्टोव्ह, 250 कुकर हॅन्डल, टेबल, खुर्च्या, तीन रॅक, 40 लायटर, 80 गॅस पाईप, 7 कुकर, 70 गॅसस्टोव्ह पॅनसपोर्ट जळून खाक झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

शिवानंद हे बसवाण गल्ली येथील हंसराज सोलंकी यांच्या दुकानात गेल्या 40 वर्षांपासून भाडय़ाने राहतात. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन कुलुप लावण्यात आला होता. त्यानंतर 11.30 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना समजली. ही घटना अकस्मित असली तरी मालक हंसराज यांच्यावर संशय असल्याचे शिवानंद यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Related posts: