|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार 

अंकली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

प्रतिनिधी/ बेळगाव

लग्नाच्या आमिषाने रायबाग येथील एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षे हा प्रकार सुरू असून अखेर लग्न केले नाही, म्हणून संबंधित तरुणीने बलात्काराबरोबरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

केरुर (ता. चिकोडी) येथील विनायक आण्णाप्पा सुतार या युवकावर भा.दं.वि. 376, 417, 420 कलमान्वये अंकली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून सुमारे 25 वषीय पिडीत तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी 15 जानेवारी रोजी रात्री या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आले असून अंकली पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.