|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » ‘अमूल’ची बनावट जाहिरात हटविण्यासाठी ‘गुगल’ला नोटीस

‘अमूल’ची बनावट जाहिरात हटविण्यासाठी ‘गुगल’ला नोटीस 

वृत्तसंस्था /अहमदाबाद :

अमूल कंपनीने बनावट जाहिरातीच्या आधारे गुगल इंडियाकडून नागरिकांची लूट होत असून अन्य मार्गाने  फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करत  गुगल  इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यातही करण्यात आल्याची माहिती अमूलने यावेळी दिली आहे.  गुगलच्या वेबसाईटवर अमूल पेंचाइजी, अमूल पार्लर आणि अमूलचा सभासद होण्यासाठीची एक बनावट लिंक तयार करण्यात आली. असून सदर लिंकवर  क्लिक करण्यात आल्यास त्यावर दाखवण्यात येणाऱया सूचनाच्या आधारे ग्राहक नोंदणी करुन घेतली जाते.

बनावट नोंदणी

अमूलचे वर्गणीदार होण्यास बनावट जाहिरात तयार करण्यात आली आहे. व्यक्ती व संस्था यांची नोंदणी करुन संबंधीताकडून 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यतची मागणी करण्यात येते. रक्कम हातात पडल्यास पुन्हा संपर्क पूर्णपणे बंद केला जात असल्याचाही गंभीर आरोप अमूलने केला आहे.

 

Related posts: