|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » एकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत

एकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 25 जानेवारीला कंगना रनौतचा मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधत रणशिंग फुंकले आहे. होय, ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना. करणी सेनेने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ला जोरदार विरोध नोंदवला आहे.

करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवले आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना नृत्य करताना दाखवले गेले आहे. हे सभ्यतेला धरून नसल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,असा इशारा या पत्रात दिला गेला आहे. इतकेच नाही तर या वादादरम्यान कंगनालाही करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचे कळते. पण या धमक्यांना घाबरणार ती कंगना कुठली. तिनेही करणी सेनेला प्रतिआव्हान दिले आहे. होय, करणी सेनेने मला धमक्या देणे थांबवले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे,अशा इशारा कंगनाने दिला आहे.

 

Related posts: