|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » घरोघरी सोयाबिनचे खाद्यपदार्थ

घरोघरी सोयाबिनचे खाद्यपदार्थ 

सोयाबिनचे गुणधर्म

1) मधुमेह 2) हृदयरोग 3) कॅन्सर 4) बद्धको÷ 6) रजोनिवृत्ती 7) लॅक्टोज इन्टॉलरन्स (गाई म्हशीच्या दुधाची ऍलर्जी) 8) रक्ताचे आम्लपित अशा आजारांवर सोयाबीन उपयुक्त ठरते.

सोयाबिनचे आम्लेट-ही पाककृती 2-4 वेळा घरी करून पहा. योग्य ते बदल अवश्य करा. हा पौष्टिक पदार्थ पूर्ण शाकाहारी आहे. पौष्टिक आहे. ‘स्ट्रीट फूड’ म्हणून लोकप्रिय होईल.

घटक- (रात्रभर भिजवलेले) तांदूळ- 3 कप, (रात्रभर भिजवलेले) सोयाबीन 1 कप, हिरवी मिरची-2, बारीक किसलेले आले अर्धा चमचा, कांदा-1 कप (चिरलेला), टोमॅटो- 1 कप (चिरलेला), मीठ चवीपुरते, तेल-2 चमचे, गरम मसाला 1/2 चमचा, पाणी-3 कप.

कृती- मिक्सरमध्ये तांदूळ, सोयाबीन व पाणी एकत्र करून डोशाच्या पिठासारखे करून घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या व आले घालून मिसळून घ्या. गरम तव्याला तेल लावून दोन्ही बाजूंनी आम्लेटप्रमाणे शिजवून घ्या. त्यावर गरम मसाला भुरभुरावा. गरम गरम खाण्यास तयार. आपणास डोसा किंवा आम्लेट करता येते असे गृहित धरले आहे. आम्लेटसारखा वास यावा म्हणून आपण नेहमीच्या मीठाऐवजी पादेलोण मीठ वापरावे. हा प्रॉडक्ट बाजारात यशस्वी करण्यासाठी ग्राहकांचा फीड बॅक घेऊन जरुर ते बदल करावेत. आता आम्लेट करता येऊ लागले की भुर्जी करणे अवघड जाणार नाही. एकदा चव जमली की आपले पूर्ण शाकाहारी आम्लेट भुर्जी सेंटर यशस्वी करू शकाल, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी जाणारे प्रवासी नेहमीच नवीन चवीची वाट पहात असतात.

सोया चपाताr-हल्ली अनेक महिला गव्हाचे दळण देताना त्यात 10 टक्के सोयाबीन मिसळतात. सोयाबिनवर प्रक्रिया केल्या नसल्यामुळे फारसा प्रसार झालेला नाही. बाजारात सोयाबीन मिश्रीत पिठे विकली जातात पण सोयाबिनचे पीठ सहसा दिसत नाही. हे उत्पादन (पीठ) करण्यासाठी रोस्टर व फ्लोअर मिलची गरज असते. महत्त्वाचे म्हणजे पीठ तयार झाल्यावर त्याच्या पोळय़ा चांगल्या व्हाव्यात यादृष्टीने बदल करावे लागतात.

साहित्य- छिलके काढलेले रात्रभर भिजवलेले गव्हाचे पीठ 80 ग्राम, सोयाबीन 20 ग्राम. सोयाबीन मिक्सरमधून काढावे. पाणी-भिजवलेले पीठ असल्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही. नेहमीप्रमाणे पोळय़ा कराव्यात. वरील पाकक्रियेप्रमाणेच पाकक्रिया करून भाकरी, धपाटे, थालीपीठ असे पदार्थ बनवता येतील.

सोया भजाr- पिंपरी-चिंचवड नगरपालिकेने महिला बचत गटांसाठी एक कार्यक्रम केला होता त्यात सोयाबिनची भजी खाल्ली. नेहमीच्याच भज्याच्या भावात. त्यानी रात्रभर भिजवलेले सोयाबीन वापरून भजी केली होती. रात्रभर सोयाबीन भिजवून वापरताना खरे तर 20 मिनिटे प्रेशरकुक करणे गरजेचे असते. पोळय़ा करताना भाजताना किंवा भजी तळताना उष्णतेमुळे लक्षात येत नसेल. मात्र आपण ग्राहकांचा फीड बॅक घेतल्यावरच विक्रीसाठी उभे रहावे. तसेच सोयाबिनमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगलेच जास्त असल्यामुळे पदार्थ पचनीय होण्यासाठी मेथी, ओवा, जिरे अशा मांसाहारातील पदार्थात वापरल्या जाणाऱया मसाल्यांचा चवीसाठी आणि पचण्यासाठी अवश्य वापर करावा. याचप्रकारे आपण सोयाबिनची चकली, शेव, उडीद वडे बनवू शकतो.

सोयाबिनचे वडs-भजी आणि वडे हे सर्वसामान्य वाटणारे पदार्थ. मात्र त्यांची बाजारपेठ कल्पना करता येणार नाही इतकी मोठी असते. शिरूरमधले एक नमकीन बनवणारे उद्योजक भेटले होते ते दर तासाला तीन टन नमकीन बनवत. त्याचे फरसाण पुणेच नव्हे तर मदुराईपर्यंत पोहोचले होते. पिकते तेथे विकत नाही. आपल्याकडे सोयाबीनचे वडे बाजारात नाहीत. मात्र दिल्लीमध्ये दिल्ली गेटपाशी संध्याकाळी सोयाबिनचे वडे विकणाऱयांच्या गाडय़ा लागतात.

आपले स्वयंपाकघर हीच आपली प्रयोग शाळा. उपलब्ध असलेल्या या व अशा माहितीच्या आधारे प्रयोग करा. पदार्थ पचला पाहिजे ही पहिली अट. पदार्थ दिसायला आकर्षक पाहिजे ही दुसरी अट. तिसरी पदार्थ जिभेलाही आवडला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या घरी वेळोवेळी पदार्थाचे सेवन कराल. आपल्याला आवडल्यानंतर मित्रांना पेश करा. मग किमतीचे गणित करून ग्राहकांपर्यंत पोहोचा.

एक होता कार्व्हर

कार्व्हर हा एक निग्रो शास्त्रज्ञ. त्या काळात अमेरिकेत शेंगदाण्याचे पीक अमाप यायचे. कार्व्हरने शेंगदाण्याचे 36 पदार्थ (काही खाद्य पदार्थ तसेच काही अखाद्य पदार्थ) विकसित केले. आपल्या गरीब बांधवांना पौष्टिक आहार मिळावा. त्यांना रोजगार मिळाला म्हणून. भारतात आज 60 टक्के जनता शेती करत असते त्यांची स्थिती अशीच गंभीर आहे. बेरोजगारीही प्रचंड आहे. आशेचा किरणही दिसत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत. पण याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आताच्या या जागतिकीकरणाच्या आणि चैनबाजीच्या लाटेमध्ये गरीबाकडे पहायला कोणाला वेळही नाही. मात्र कार्व्हरसारखे जगणे सोपे नसते. त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या पार्टीला त्याला बाहेरच थांबावे लागले होते. कारण तो निग्रो होता आणि त्याचे कपडे समारंभास साजेसे नव्हते.

जमीन, यंत्रे, भांडवल यावर कंपन्यांचे यश मोजले जायचे. आता ‘ओला’ ‘उबेर’ सारख्या कंपन्या स्वतःची एकही टॅक्सी नसताना जागतिक दर्जाच्या कंपन्या म्हणून मान्यता पावतात. या पुढील काळात ‘ज्ञान’ हेच महत्त्वाचे भांडवल असेल.  ‘मुद्रा’ योजनेत सोयाबीनचा समावेश आहे. इंटरनेटवर पाहिले तर पन्नास एक कंपन्या सोयाबिनच्या दुधाचे फ्लांट विकत आहेत. पण आपण सोयाबिनचे दूध विकले जात असताना पाहिलेले नसते. आपण गृहउद्योगात आपला उद्योग सुरू करावा. कायदेशीरपणे करावा. बँकेतून व्यवहार करावेत. बँकेत पत मिळवावी. आपला फोकस ग्राहकावर असावा. ज्यावर आपण फोकस करतो ते वाढीस लागते.

प्रक्रिया उद्योग वाढीस लागत नाही कारण तोटा होण्याची भीती. ही भीती कमी करण्यासाठी जसे आय टी क्षेत्राला स्टार्ट अपमध्ये लॅब वगैरे सुविधा मिळतात तशाच सुविधा अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळाव्यात. प्रत्येक तालुक्मयाच्या ठिकाणी अशी एक प्रयोगशाळा असावी जेथे नवउद्योजकांना सर्व सुविधा भाडय़ाने मिळाव्यात. म्हणजे त्यांना कर्ज काढावे लागणार नाही. लायसेन्स काढावे लागणार नाही. उत्पादन केलेले विकले गेले तर स्वतःची फॅक्टरी उभारावी.

पद्माकर देशपांडे

Related posts: