|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिजाऊ मध्ययुगातील क्रांतीकारी राजमाता

जिजाऊ मध्ययुगातील क्रांतीकारी राजमाता 

बेळगाव / प्रतिनिधी

देशात अनेक महान क्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. वर्तमानात त्यांचे व्यक्तिमत्त्व लक्षात राहते मात्र कर्तृत्व पडद्याआड झाकून जाते. जिजाऊ, ताराबाई, येशूबाई यांनी राजकारण, लढाऊवृत्ती, संस्कारण यामध्ये बरेच बदल घडून आणले. महाराष्टाला झगडण्याची वृत्ती दाखवून दिलेल्या जिजाऊ मध्ययुगातील क्रांतीकारी राजमाता आहेत, असे उद्गार डॉ. मंजुश्री पवार यांनी काढले.

 सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘जिजाऊ ते ताराराणी : शिवकालीन स्त्री कर्तृत्व’ या विषयावर त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रम कॅम्प येथील गोगटे रंगमंदिरमध्ये पार पडला. प्रारंभी वाचनालयाचे सदस्य नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंजुश्री पवार यांचे वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांनी ग्रंथ देऊन स्वागत केले. व्यासपीठावर कार्यवाह ऍड. नागेश सातेरी, सहकार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाल्या, ताराराणी व जिजाऊ या लढवया स्त्रिया होत्या. आजच्या जडणघडणीत त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. कैद, लढाया, अन्याय या सर्वांना तोंड देत जिजाऊ वीर राजमाता म्हणून घडत गेल्या. जिजाऊंच्या तालमीत शिवबा घडू लागले. जिजाऊंनी मावळय़ांना एकत्रित केले. त्यातूनच तानाजी, बाजी, येसाजी निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले

Related posts: