|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माणमध्ये टँकरची अर्धशतकाकडे वाटचाल

माणमध्ये टँकरची अर्धशतकाकडे वाटचाल 

एल.के.सरतापे/ म्हसवड

दर तिन वर्षाला दुष्काळाचे संकट माण खटाव तालुक्यातील माणदेशी माणसे सोसतात  कधी चारा, कधी पाणी तर नेहमीच रोजगाराचा प्रश्न आ वासुन पडलेला आसतो गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यातच  मार्च एप्रिल पासुनच पाणी, चारा व रोजगाराचा प्रश्न बळीराजा सह सामान्याना पडला होता विहरीत पाणी नसल्याने रानात पिके नाहीत राने बोडकी पडली, जनावरांच्या चार्याचा प्रश्न उभा राहिल्याने मिळेल त्या भावात जनावरे बाजारात तर काही कसाबाला दिली व रोजगारासाठी सप्टेंबर आँक्टोबर मध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर मुलाबाळासह ऊस तोडण्याच्या कामासाठी कारखान्याच्या टोळीत उसतोडी म्हणून तर काही रंगकामगार मजुर म्हणून कुटुंबासह स्थालांतरीत झाल्यावर शासनाने दुष्काळ जाहिर केला पण त्याच्या सवलती चार महिने झाले तरी सरकारची दुष्काळी मदत बळीराजाला मिळाली नाही नेहमी सामाजिक लोकहित्ताच्या कामाला प्राधान्य देणार्या माणदेशी फांऊडेशने बजाज कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी नव्या वर्षात सुरु करुन पंधरा दिवसात साडे सहा हजार जनावरे व चार हजार माणसे छावणीत दुष्काळी चटके सोसत कडाक्याच्या थंडीत ही सरकारवर लाखोली वाहत आसुन माण तालुक्यात 41 टँकरने 73 हजार मानसांना पाणी पुरवठा सुरु आसल्याने या महिणा अखेर  वाढत्या पाणी टंचाई मुळे  टँकरची संख्या पंन्नासी ओलाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

        गेल्या आठ दिवसात  जिह्यात पाणी टंचाईचे आर्धशतकी गावांना 51  टँकरने पाणी पुरवठा सुरु आसला तरी एकटय़ा माण तालुक्याने चाळीसी ओलांडून ऐक्के चाळीस (41)टँकरने 41 गावे व 312 वाडय़ामधील 72 हजार 514 नागरीकांना व 16 हजार 769 जनावरांना पाणी पुरवठा केला जात आहे तर 12 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. शासकीय 7 टँकर तर खाजगी 34 टँकरने 94 खेपा पाणी टंचाई गावाना सुरु आहे  तालुक्यातील आंधळी पिंगळी राणंद मासाळवाडी ढाकणी गंगोती हि मोठी पाणी साठय़ाचे तलाव व धरणे आठली आहेत इथे माणसांना टँकरने पाणी मिळेना तिथे जनावरांना कुठले पाणी मिळणार अनेक गावातील पाणी योजना शोपिस बनल्या आहेत टँकरचे प्रस्ताव देवून हि दोन दोन दोन महिणे लोटले तरी पंचायत समितीकडुन वा तहसीलदार कार्यालयातुन टँकर मिळत नसल्याने प्रशासनाचा कारभार चव्हाटय़ावर आला आसुन कागदी घोडे नाचवून पाणी टंचाई दूर होणार का असा सवाल टंचाई भागातील नागरीक करत आहेत

    चार्याचा प्रश्न चार महिण्यापासून बळीराजापुढे आ वासुन उभा राहिला होता सरकारची दुष्काळ निवारण घोषणा कागदावर राहिली आहे चारा उत्पादन योजनेचा बोजवारा उडाला आहे  प्रशासन व कृषी विभाग दुष्काळाचे कागदी घोडे नाचवून कागदोपत्रावरुन शेतकयांना नाचवण्याचे काम करत आहे काही जिह्यात शेतकयांच्या 500,  1000, 2000रुपये खात्यावर पैसे जमा झाले आहेत सरकारणे खात्यावर टाकलेले 500 व 1000 रुपयेत मयताचे साहित्य तर मिळते का हे कोण सरकारला सांगणार असा सवाल शेतकरी करत आहे  

      तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्याने व शेतात गत वर्षी व चालू वर्षी शेतात पिक निघेल ऐवंढा पाऊस नसल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर आसताना हि रोजगार हमी , वनक्षेत्रपाल व सामाजिक वनीकरणाचे एक हि काम सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चालू नाही तालुका कृषी विभागा मार्गदर्शना खाली 4 कामे सुरु आसुन 114मजुर काम करत आहेत, रेशीम उद्योग तुती लागवड शेतीची 33 कामे सुरु आसुन त्यावर 780 मजुर काम करतात , पंचायत समितीच्या माध्यमातून फळबाग लागवड, विहरी पुनर्भरण, खोदाई, आदी  48 कामे सुरु आसुन या कामावर 1512 मजुर काम करत आहेत 

  भाजपा सेना या आघाडी शासनाने तिन महिण्यापूर्वी माण तालुका दुष्काळ जाहिर केला सवलती जाहिर करण्यास दोन महिने लागले या सवलती आजुन पर्यंत ना शेतकयांना मिळाल्या ना बेरोजगार तरुनांच्या हाताला काम काम मिळाले मिळाले फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा काँलेज मध्ये जाण्यासाठी मोफत पास पास मिळाले मात्र बस कुठे आहे बसेस नसल्याने पास काढून हि वडापचा आधार घेवूनच विद्यार्थी घरी येजा करत आहेत हिच का दुष्काळाची सवलत असा सवाल माणवासीय करत आहेत गेल्या वर्षी अवकाळी पावसाने कोटय़वधी रुपयाचे शेतकयांचे  नुसकान झाले त्याचे मदत येवून दोन महिने झाले तरी हि शेतकया पर्यंत आजुन मदत पोहचली नाही हि मदत शेतकयांच्या खात्यावर जमा होणार कि शासकीय दलालच मालामाल होणार 

     तीन महिण्या पूर्वी दुष्काळ जाहिर झाला मात्र त्याच्या सवलती वा अंमलबजावणी आज पर्यंत झाली नसल्याने जगाचा पोशिंदा आसलेला  बळीराजला पावसाने मारले आसताना शासन बळीराजाला तारल असे शेतकयांना वाटत होते मात्र झोपलेले शासन व पाण्याच्या राजकारणाचे शितयुध्दात आडकलेले प्रतिनिधी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी गाभिर्याने न घेतल्याने पाणी टंचाई गावात टँकरची मागणी करुन हि दोन महिने हेलपाटे घातले तरी माणचा प्रशासन विभाग टँकर देवू शकत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या बैठकीला महिण्या सहा महिण्यातुन हाजेरी लावणार्या पालक मंत्री महोद्यानी एक वेळ तरी दुष्काळी माणच्या परिस्थितीकडे गाभिर्याने दखल घेण्यासाठी या भागात दौरा करुन पाणी चारा टंचाईचा आढावा घेणे गरजेचे होते दोन वेळा मंत्र्याच्या ताफ्यात येवून दहिवडी मधुनच माघार जावून तालुक्याची पाणी टंचाई दिसली का पालकमंत्री महोद्यानी कागदे रंगवून अधिकार्याना नाचवण्या पेक्षा टँकर मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर देवून गावो गावी व छावणी नजिक रोजागर हमीची कामे सुरु करुन बेरोजगार मजुरांना रोजगार देवून बेरोजगारांची शेतकयांची उपासमार थांबवण्यासाठी आत्ता तरी बापू प्रयत्न करून पालकत्वाची घेतलेली जबाबदारी पूर्ण करणार का असा सवाल दुष्काळी तालुक्यातील जनता करत आहे  .

   

     सातारा माण मधील म्हसवड हे नगर नेहमीच दुष्काळावर चर्चित राहिलेले गाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात वर्षातील सर्वात कमी पाऊसाची नोंद देखील इथेच होत असते. नेहमीच सामाजीक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या चेतना सिंन्हा व विजय सिंन्हा यांनी माणदेशी फाउंडेशनखटाव बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे सुरु केलेल्या जनावरांच्या एकमेव चारा छावणीत पंधरा दिवसात साडे सहा हजाराहुन अधिक जनावरे दाखल झाली असल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरुप आले असुन जनावरांच्या देखभालीसाठी चारा छावणीतच रहात असलेल्या शेकडो शेतकयांची  देखभाल आता फाऊंडेशनच्या माध्यमातुन केली जात आहे, त्यांना पिण्याचे पाणी व थंडीपासुन बचाव करण्यासाठी गरमा गरम ब्लँकेट देण्याबरोबरच त्यांच्यासाठी अल्प दरात वैद्यकिय सेवे बरोबर छावणीकडे जाणारा पुळकोटी रोड स्व खर्चाने दुस्रयांदा तयार केला तरी हि बांधकाम विभागाला जाग येत नाही झोपेचे सोंग घेतलेल्या या अधिकारी वर्गावर अंकुश नसल्याने सामान्याच्या जिवासी खेळ अधिकारी करत आहेत छावणीतील शेतकरी जनावरासह छावणीत मुलाबाळासह राहत आसल्याने छावणीलाच आपले घर बनवून मुक्या जनावरांना जगवून बळीराजा माणूसकी जिवंत ठेवण्याचे काम करत आहे या कामाला शासन बळ देवून दुष्काळाच्या सवलती आनुदान लवकरात लवकर शेतकयांना व सामान्याना मिळावे हि अपेक्षा दुष्काळ ग्रस्तमाण खटाव तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

Related posts: