|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » तरुणाकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला

तरुणाकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला 

ऑनलाईन  टीम  / भंडारा :

 बहिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याने भावाने आई-वडिलांच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घटना घडली आहे. मृत मुलाचे  नाव अनिकेत बडोले (वय 22 वर्ष) असे  आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यातील किही-एकोळी गावातील अनिकेतचे त्याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला. यानंतर मुलीच्या भावाने आणि वडिलांनी त्याला बेदम मारहाण करत, टी-शर्टने गळा आवळून खून केला. मग त्याचा मृतदेह गावाशेजारी असलेल्या नाल्यात फेकून दिला. अनिकेत बेपत्ता झाल्याने त्याचा भाऊ तुषार बडोले यांनी साकोलीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांना नाल्यात अनिकेतचा मृतदेह आढळला. 20 जानेवारीला जवळपास 20 तासांनी त्याचे  शवविच्छेदन झाले. मुलीचा भाऊ, आई आणि वडिलांनी अनिकेतचा खून केल्याचे  तपासात समोर आले. पोलिसांनी मुलीचे वडील रामेश्वर वालदे, आई ममता वालदे, भाऊ मेघराज वालदे यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.