|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » मेहुल चोक्सीने सोडले भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी अवघड होणार

मेहुल चोक्सीने सोडले भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी अवघड होणार 

 ऑनलाईन  टीम  /  नवी दिल्ली:

देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले  आहे. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या चोक्सीने त्याचा पासपोर्ट एँटिग्वातील भारतीय उच्चायुक्तालयात जमा केला. पीएनबीमधील घोटाळा समोर येताच चोक्सी जानेवारीत देश सोडून पळाला. आता त्याने भारतीय नागरिकत्व सोडल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची शक्यता धूसर झाली आहे. 

मेहुल चोक्सीने आज भारतीय पासपोर्ट जमा करत अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले. चोक्सी आता भारतीय नागरिक नसल्याने त्याला भारतात आणणेखी अवघड झाले. विशेष म्हणजे मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात उद्याच सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच त्याने स्वत:ला अँटिग्वाचा नागरिक घोषित केले. यासाठी त्याने एकूण 177 डॉलरचे हमीपत्र दिले. याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्र्यालयाने गृह मंत्रालयाला दिली आहे. चोक्सीने जमा केलेल्या पासपोर्टचा क्रमांक Z3396732 असा आहे. यापुढे चोक्सीचा अधिकृत निवासी पत्ती हार्बर, अँटिग्वा असेल. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत. मात्र त्याने अँटिग्वाचे  नागरिकत्व स्वीकारल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे. मागील  सुनावणीवेळी चोक्सीने त्याच्या प्रकृतीचे  कारण दिले होते. प्रकृती ठिक नसल्याने मानातून 41 तास प्रवास करुन भारतात येऊ शकत नाही, असे कारण चोक्सीने दिले होते. चोक्सीला फरार घोषित करण्यासाठी पीएमएलए विशेष कोर्टात सक्तवसुली संचलनालयाने याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान चोक्सीने न्यायालयात प्रकृती अस्वास्थाचे दिले.