|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या ; अमेरिकेतील हॅकरचा दावा

ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या ; अमेरिकेतील हॅकरचा दावा 

ऑनलाईन टीम / लंडन :

भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱया ईव्हीएम हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंग झाले होते. तसेच या ईव्हीएम हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्ये÷ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला आहे.

सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते. भाजपाच नव्हे तर आम आदमी पक्षानेही ईव्हीएम हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला, असा गौप्यस्फोट या हॅकरने केला आहे. इव्हीएम हॅकिंग संदर्भात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा आरोपही त्याने यावेळी केला. समाजवादी पक्ष आणि बसपानेही इव्हीएम हॅकिंग करण्यासाठी संपर्क केल्याचा आरोप या हॅकरने केला. काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांना ईव्हीएम हॅकिंगबाबत माहित असल्याचाही आरोप त्याने केला. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅकरचे हे दावे फेटाळून लावले आहेत. लंडनमधील एका कार्यक्रमात भारतातील ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील ईव्हीएम सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Related posts: