|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कबनूरात मंडल अधिकारी कार्यालय व गावचावडीचे उद्घाटन

कबनूरात मंडल अधिकारी कार्यालय व गावचावडीचे उद्घाटन 

वार्ताहर/ कबनूर

येथील झेंडा चौकात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा नियोजन मधून 20 लाख खर्चाची उभारण्यात आलेली गावचावडी व मंडल अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महासुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आनंद दांडेकर यानीं केले. तद्नंतर जिल्हा नियोजन व विकास समितच्या फंडातून 20 लाख रूपये खर्चाच्या मंजूर झालेल्या तलाठी कार्यालय व मंडल आधिकारी कार्यालयाची इमारत उभारण्यात आली. ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासून असलेल्या मागणीचे आज सत्यात उतरले. शासनाला कोटय़वधी रूपये उत्पन्न मिळवून देणार्या महसुल विभागाला स्वमालकीची इमारत उभी झाली. अशा या इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावर झाले.

यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार सुधाकर भोसले, सरपंच उदय गीते, उपसरपंच प्रदीप मणेरे, जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, माजी सभापती रेश्मा सनदी, अजितमामा जाधव, प्रमोद पाटील यांचेसह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत, भाजपा कार्यालय यांच्यावतीने नामदार पाटील यांचा सत्कार करणेत आला. मंडळ अधिकारी गोन्सालविस, तलाठी अनंद दांडेकर, कोतवाल शिवाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुंभार तसेच मान्यवर मंडळी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व भाजपाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related posts: