|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या शोपियानममधील हेफ श्रीमल भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. शोपियानमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.