|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » प्रभात डेअरी -लॅक्टेलिस गुपमध्ये लवकरच 1700 कोटीचा व्यवहार

प्रभात डेअरी -लॅक्टेलिस गुपमध्ये लवकरच 1700 कोटीचा व्यवहार 

वृत्तसंस्था/ मुंबई

प्रभात डेअरी आपला फ्लॅगशिप डेअरीचा व्यवसाय लवकरच विकणार असल्याची घोषणा केली आहे. फ्रान्सची लॅक्टेलिस ग्रुपला प्रभात डेअरी 1700 कोटी रुपयांमध्ये विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती दिली आहे. तर प्रभातने उपडेअरी तिरुमला मिल्क प्रोडक्ट सोबत करार करणार असल्याची माहिती सादर केली असून संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आल्यावर प्रभात डेअरी ऍनिमल न्यूट्रिशन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रभात डेअरी 20 वर्ष जुनी संस्था आहे. दैनंदिन 15 लाख लीटर दूधावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये असल्याचे स्पष्टीकरण डेअरीने दिले आहे. यातून 1 हजार 554 कोटी रुपयांचा वर्षाला नफा कमाई होत असल्याची नोंद केली आहे.

फ्रान्सची दुसरी मोठी डेअरी

लॅक्टेलिस ही फ्रान्समधील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी फूड कंपनी आहे. 58 टक्क्यांचा महसूलाचा वाटा हा यूरोपमधून होत आहे. वर्षाचा महसूल कोटय़वधीत

प्रभात व त्यांची उपसंस्था सनप्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज यांचीही विक्री करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर डेअरीचा प्रवास वर्षाला 1 हजार 554 कोटी रुपयापर्यंत नफा कमाई करत असून वार्षिक उलाढालीत तेजी असल्याची माहिती संचालक विवेक निर्मल यांनी यावेळी दिली.

Related posts: