|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कमला हॅरिस यांच्या उमेदवारी प्रस्तावामुळे भारतीयांना आनंद

कमला हॅरिस यांच्या उमेदवारी प्रस्तावामुळे भारतीयांना आनंद 

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेत 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजावयास प्रारंभ झाला आहे. काही दिवसांपूर्वी डेमॉक्रेटिक पक्षाच्या तुलसी गॅबार्ड यांनी त्यांच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ याच पक्षाच्या आणखी एक भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस यांनीही त्यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे तेथील भारतीय वंशाच्या नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण
आहे.

कमला हॅरिस या 54 वर्षांच्या असून त्यांनी सोमवारी अधिकृतरित्या डेमॉपेटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी आपला प्रचार सुरू केला.

अमेरिकेतील पद्धतीनुसार एखाद्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याला अशा प्रकारे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतात. निवडणूक जवळ आल्यानंतर अशा इच्छुकांपैकी जो अधिक लोकप्रिय ठरेल त्याला संबंधित पक्षाकडून उमेदवारी देण्यात येते.

इच्छुकांमध्ये निवडणूक

एखाद्या पक्षाच्या अनेक इच्छुकांमध्ये निवडणूक होते. यात त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, प्रांतस्तरीय लोकप्रतिनिधी तसेच त्या पक्षाचे काही निवडक मतदारही भाग घेऊ शकतात. या निवडणुकीत जो विजयी होतो त्याला पक्षाची उमेदवारी मिळू शकते. सध्या भारतीय वंशाच्या दोन महिला डेमॉक्रेटिक पक्षाकडून रणात उतरल्याने अमेरिकेतील भारतीय वंशाचा समाज आता त्या देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यामुळे तेथील भारतीय वंशाच्या नागरीकांमध्ये समाधानाची भावना आहे. इंडियन-अमेरिकन इंपॅक्ट फंड नावाची एक अमेरिकन भारतीयांची संस्था असून ती कोणत्याही पक्षातून लढू इच्छिणाऱया भारतीय वंशाच्या इच्छुकांना समर्थन व साहाय्य देते. कमला हॅरिस यांच्या उमेदवारी प्रस्तावावर या संस्थेनेही प्रसन्नता व्यक्त केली असून त्या उमेदवारी मिळविण्याची क्षमता असणाऱया महिला आहेत, असे या संस्थेने प्रतिपादन केले.

 

Related posts: