|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » ‘या’ राज्यातील उद्या केबल टीव्ही बंद

‘या’ राज्यातील उद्या केबल टीव्ही बंद 

ऑनलाईन टीम / बेंगळुर :

ट्राय तर्फे लागु करण्यात येणाऱया नव्या केबल दराच्या विरूध्द राज्यातील केबल चालकांतर्फे उद्या केबल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 6 ते रात्री 10 वा. पर्यंत केबल धारकांना उद्या टीव्ही पाहता येणार नाही. या नुतन केबल दराच्या विरूध्द केबल ऑपरेटरांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्नाटका बरोबरच आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, तमिळनाडु येथे देखिल केबल बंद ठेवण्यात येणार आहे. देशातील काही कॉर्पोरेट संस्थांना आधार देण्याकरीता सरकारने हा नवा नियम जारी केला असल्याचा आरोप केबल चालकांतर्फे करण्यात येत आहे. या नव्या निमावळींमुळे केबल चालकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे.