|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जलसंकटाने वाढणार बँकांचा एनपीए

जलसंकटाने वाढणार बँकांचा एनपीए 

वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडचा अहवाल :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाण्याच्या समस्येमुळे बँकामंध्ये नॉन परफॉर्मिंग असेट्सचे (एनपीए) संकट आणखीन वाढू शकते. अनेक कर्जदात्यांना जलसंपदेचे जोखीम असणाऱया क्षेत्रांमध्ये कर्जाचे वाटप केल्याने ही स्थिती निर्माण होऊ शकते असे एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एनपीएत वाढ होत असल्याने बँकिंग क्षेत्रावर मोठे दडपण आले आहे. जलसंकट बँकांच्या तणावपूर्ण ताळेबंदातील तरलतेत आणखीन घट करू शकतो असे वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)ने बुधवारी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी डब्ल्यूडब्ल्यूएफ ही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत आहे.

इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) सहकार्याने प्रकाशित डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचा अहवाल ‘छुपी जोखीम आणि अप्रकाशित संधी : जल आणि भारतीय बँकिंग क्षेत्र’मध्ये पाण्याचे संकट बँकांसाठी कशाप्रकारे जोखीम निर्माण करते याचा उहापोह मांडण्यात आला आहे. जल जोखिमीमुळे वीज आणि कृषी क्षेत्रातील साधनसंपत्ती निरुपयोगी ठरू शकते हे यात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही क्षेत्रांनाच भारतीय बँकांनी सर्वाधिक कर्जाचे वाटप केले आहे.

अहवालानुसार भारतीय बँकांच्या एकूण कर्जाच्या सुमारे 40 टक्के हिस्सा पाण्याची जोखीम अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱया क्षेत्रांमध्ये देण्यात आला आहे. भारतीय बँकांच्या एकूण कर्जाच्या 10 टक्के हिस्सा अगोदरच एनपीए ठरला आहे.  कर्जदारांनी परतफेड न केल्याने बँकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या जोखिमींमुळे बँकांमधील रोकडप्रवाह आणखीन प्रभावित होणार आहे. नीति आयोगाच्या निष्कर्षाचा दाखला देत देशात वर्तमान जलसंकट स्वतःच्या सर्वात गंभीर स्थितीत पोहोचल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

Related posts: