|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला : पी. चिदंबरम

रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला : पी. चिदंबरम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भारतीय रेल्वे सेवेमध्ये येत्या दोन वर्षांमध्ये एकूण चार लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी (23 जानेवारी) दिली. पियुष गोयल यांनी केलेली ही नोकरभरतीची घोषणा म्हणजे ’आणखी एक जुमला’ असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे.

पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदे भरण्यासाठी आता जाग आली, असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी हाणला आहे. चिदंबरम यांनी गुरुवारी (24 जानेवारी) मोदी सरकारवर ट्विटरवरुन शाब्दकि हल्ला चढवला.“रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदे रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. “कित्येक सरकारी विभागांमध्ये हीच परिस्थिती आहे. एकीकडे सरकारी विभागांमध्ये मोठय़ प्रमाणात पदं रिक्त आहेत आणि दुसरीकडे तरुणवर्ग बेरोजगार आहे’’, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related posts: