|Sunday, August 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंग गॅलेक्सीच्या फोनवर 12 हजार रूपयांची सूट

सॅमसंग गॅलेक्सीच्या फोनवर 12 हजार रूपयांची सूट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

फ्लपिकार्टवर सुरू झालेल्या सॅमसंग डेज या सेलमध्ये सॅमसंगच्या मोबाइलवर 12 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल 24 जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान सुरू राहणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 वर 8 हजार 100 रुपयांची सूट दिली जात आहे. गॅलेक्सी नोट 9 या स्मार्टफोनवर 12 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन 6 जीबी रॅम प्लस 6 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी या दोन पर्यायात उपलब्ध आहे. या दोन्ही मोबाइलवर 12 हजारांची सूट दिली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 या स्मार्टफोनवर 5 हजार 100 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनमध्ये 24 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए7 स्मार्टफोनवर 6 हजार 910 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. गॅलेक्सी एस 8 या फोनवरही 3 हजार 444 रुपयांची सूट आहे. हा फोन नो ईएमआय कॉस्टवर खरेदी करण्याची सुविध आहे. सॅमसंग ऑन8 हा फोन 12 हजार 990 रुपयांना मिळत आहे. सॅमसंग ऑन6 9 हजार 990 रुपयांना मिळत आहे. या फोनची किंमत 17 हजार 900 रुपये इतकी आहे. सॅमसंग ऑन एनएक्सटी 9 हजार 990 रुपयांना मिळत आहे. गॅलेक्सी ऑन 5 हा फोन 5 हजार 490 रुपयांना मिळत आहे.