|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » एकांकिकेची होणारी ओढाताण थांबवा

एकांकिकेची होणारी ओढाताण थांबवा 

 

पुणे: कधीकधी एकांकिका खेचून आपण त्याचा दीर्घांक करतो. ही ओढाताण थांबवणे आवश्यक आहे. दीर्घांक ही गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे, कारण त्याला स्वत:ची एक वेगळी भाषा आहे. त्याचे वास्तव रूपच प्रखरतेने रंगभूमीवर मांडणे आवश्यक आहे. परंतू सध्याच्या घडीला तसे होताना दिसत नाही. दीर्घांकामध्ये वेगळे आयाम व रंगभूमीचे दृश्य स्वरूप दिसले पाहिजे, तेव्हाच दीर्घांकाचे रंगभूमीवर परिपूर्णरीत्या सादारीकरण करता येवू शकेल’असा कानमंत्र अभिनेते विजय केंकरे यांनी तरुणाईला दिला.

राजा परांजपे प्रोडक्शनच्या वतीने चौथ्या ‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धेचे’ आयोजन भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विजय केंकरे बोलत होते. यावेळी राजा परांजपे प्रोडक्शनचे अर्चना राणे, अजय राणे, विनिता पिंपळखरे, अनिरुद्ध खुटवड,नितीनधंदुकेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत राज्यातील 34 संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 10 संघांनी अंतिम फेरीत दीर्घांक सादर केले. स्पर्धेचे परीक्षण विनिता पिंपळखरे, अनिरुद्ध खुटवड,नितीनधंदुकेयांनी केले.

स्पर्धेचे विजेतेपद रंगपंढरी संघाच्या ‘निरुपण’ या दीर्घांकाने पटकावले. द्वितीय पारितोषिकगंधर्वकलाधारायासंघाच्या‘रेनबोवाला’ तर तृतीय पारितोषिक चक्री पुणे संघाच्या ‘विपाशा’ या दीर्घांकाला मिळाले. यावेळी परीक्षाकांच्या वतीने निवडण्यात आलेले ‘विशेष पारितोषिक’दअर्टीक्युलेटथेसपियनसंघाच्या‘दलाईटकॅचर’ या दीर्घांकाला देण्यात आले. सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी व लेखनासाठी ईश्वर अंधारे (निरुपण), प्रकाश योजनेसाठी संकेत पारखे (द लाईटकॅचर), संगीतासाठी हर्ष राउत व विजय कापसे (निरुपण), नैपथ्यासाठी गजानन कांबळे (निरुपण) पारितोषिके देण्यात आली. सर्वोत्तम स्त्री अभिनयासाठी ऋतिका श्रोत्री (द लाईटकॅचर) व सर्वोत्तम पुरुष अभिनयासाठी मयूर बोरसे (निरुपण) यांना गौरविण्यात आले. अक्षय जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अजय राणे यांनी आभार मानले.

 विजय केंकरे म्हणाले की, सध्या तरुण पिढी नाट्यक्षेत्रात मल्टीमेडीयाचा मुक्तहस्ते वापर करत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी आधारित नवनवीन प्रयोग रंगभूमीवर दिसत आहेत. थोडक्यात, नाटकांमध्ये ही नवीन पर्वाची सुरुवात असून तरुणाईने हे प्रयोग सातत्याने करावेत.

 

Related posts: