|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री

उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत काल उत्तर प्रदेश दिवस साजरा झाला, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जेव्हापासून भाजपचे  सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. मुंबई फिल्मसिटीचे उपाध्यक्ष इंद्रजित मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. जेव्हापासून आमचे  सरकार आले  आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले आहेत. असे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे, असे फडणवीस म्हणाले.