|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव

राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून राज्यातील 44 पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरीत 40 पोलिसांना पोलीस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

 

राजधनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्राला एकूण 44 पुरस्कार मिळाले आहेत. राष्टपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक 48 बहादूर पोलिसांना देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलीस अधिकाऱयांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलीस अधिकाऱयांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकास जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, दरवषी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.