|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्रीय उद्योजकता स्पर्धेचे केआयटीला उपविजेतेपद

राष्ट्रीय उद्योजकता स्पर्धेचे केआयटीला उपविजेतेपद 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मुंबई येथे राष्ट्रीय तंत्रनिकेतन अर्थात आयआयटी बॉम्बेत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय उद्योजकता निर्मिती स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी (स्वायत्त), महाविद्यालयाच्या उद्योजकता विभागाने (ई सेल) द्वितीय क्रमांक पटकावला. देशभरातून 750 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. यामधून उपविजेतेपदाचा बहुमान मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक देवून केआयटीच्या संघाला गौरवण्यात आले.

मुंबई येथील आयआयटी बॉम्बे यांनी जून 2018 मध्ये देशभरातील महाविद्यालयांसाठी ही अभिनव स्पर्धा सुरु केली. जवळ-जवळ गेले 6 महिने या स्पर्धेचे, ई सेल संघ बांधणी, इलिमिनेट, क्विझ, संघ चर्चा अशा विविध फेऱया पार पडल्या. यानंतर केआयटीच्या संघाला आयआयटी बॉम्बे यांच्या ई सेल ने सादरीकरणासाठी निमंत्रित केले. देशभरातून आलेल्या निवडक 750 महाविद्यालयांमध्ये केआयटीतून गेलेल्या 14 विद्यार्थ्याच्या संघाने हे यश संपादन केले. पश्चिम विभागातून अशा प्रकारचे सादरीकरण करणारे केआयटी हे संघ म्हणून पहिले महाविद्यालय ठरले. या विद्यार्थ्यामध्ये सत्यम भोसले (समन्वयक), विश्वास विश्वकर्मा, अमृता माने, ऋतुजा राजगोळीकर, ओंकार देसाई, अंजली धामेजा, सोहम पटेल, यशश्री पाचलग, सुकुमार जोशी, रविराज पाटील, दर्शनी चोपडे, दिवीजा भिवटे, सुस्मिता राजपूत, धवल जिरगे यांचा सहभाग होता.  या  विद्यार्थ्यांना संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, प्रा. विदुला वास्कर, प्रा. राजेश गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

केआयटीतर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक

केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना वाव देण्यासाठी केआयटीने इनोव्हेशन ऍण्ड इन्क्युबेशन सेंटर चालू केले आहे’’ त्यामुळे भविष्यातील उद्योजक घडण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. या विद्यार्थ्यांचे चेअरमन भरत पाटील, व्हाईस चेअरमन सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

Related posts: