|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस पदक

उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस पदक 

प्रतिनिधी/ सोलापूर

कर्तव्य बजावताना उल्लेखनिय कामगिरी करून देशसेवा केल्याबद्दल सोलापूर जिह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील तसेच रेल्वे सुरक्षा बलातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय गोडलोलू यांना पालीस पदक देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली. सोलापूर जिह्यातील या दोघांना पोलीस पदक जाहिर झाल्यानंतर जिह्यातील पोलीस तसेच रेल्वे पोलीस दलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सीमेवरील तसेच देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱया सर्वच सुरक्षा दलातील अधिकारी ते कर्मचायांपर्यतच्या जवानांना त्यांच्या कामगिरीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पदक, पोलीस पदक देण्यात येते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील 44 जणांना विविध पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर जिह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील आणि सोलापूर रेल्वे सुरक्षा दलातील दत्तात्रय विश्वनाथ गोडलोलू यांचा समावेश आहे.

  पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सन 1998 मध्ये पोलीस उपाधिक्षक म्हणून पोलीस दलातील सेवेला प्रारंभ केला. मूळचे सांगली जिह्यातील मनोज पाटील यांचे शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये तर सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले. संगणक तंत्रज्ञानाची उच्च पदवी संपादन करून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून पोलीस उपाधिक्षक पदाची परिक्षा दिली. त्यातून ते पहिल्याच प्रयत्नामध्ये उतीर्ण झाले. त्यानंतर त्यांची पहिलीच पोस्टींग दि. 1 जानेवारी 1998 रोजी नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये झाली. त्यानंतर जळगांव, कोल्हापूर, कराड येथे पोलीस उपाधिक्षक पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले. नंतर त्यांना दि. 20 ऑगस्ट 2006 रोजी सोलापूर जिह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. दोन वर्ष त्यांनी सोलापूर जिह्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्यानंतर त्यांची बदली पुणे नंतर ठाण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात नंतर पुन्हा पोलीस उपायुक्त म्हणून पुणे शहरात बदली झाली. त्यानंतर त्यांना 19 मे 2015 रोजी पुण्यातील राज्य राखीव दलाचे समादेशक म्हणून कार्यभार देण्यात आला. त्यानंतर ते पोलीस उपायुक्त म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असताना त्यांना पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती देऊन सोलापूर जिह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून ते सोलापूर जिह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेक चांगले उपक्रम ते सोलापूर जिह्यातील नागरीकांसाठी आणि पोलिसांसाठी राबवत आहेत. एक वेगळा ठसा ते उमटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 त्यांच्या 20 वर्षाच्या पोलीस दलातील सेवेत त्यांना वाहतुक व्यवस्थापनेत तंत्रज्ञान वापरून त्यातील सुधारणा करण्याच्या कामाबद्दल भारत सरकारकडून राष्ट्रीयस्तरावरील अनेक पुरस्कार देण्यात आले. तसेच सन 2013 मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले. आपल्या पोलीस दलातील सेवेत त्यांनी विविधांगी कामगिरी केल्याबद्दल त्यांना भारताचे राष्ट्रपतीकडून पोलीस पदक जाहिर करण्यात आले.

 

 तसेच रेल्वे सुरक्षा दलातील सोलापूर विभागात कार्यरत असलेले दत्तात्रय गोडलोलू हे सोलापूरचे असून त्यांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेबद्दल भारत सरकारकडून पोलीस पदक जाहिर करण्यात आले. सोलापूर जिह्यातील या दोघांचा समावेश पदकांच्या यादीत झाल्याने शहर जिह्यातील पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Related posts: