|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खटावमध्ये ऊसाच्या थकीत बिलाच आणि एकरकमी एफआरपीच आंदोलन पेटणार…

खटावमध्ये ऊसाच्या थकीत बिलाच आणि एकरकमी एफआरपीच आंदोलन पेटणार… 

प्रतिनिधी/ वडूज

चालू गाळप हंगामातील  ऊसाची एफआरपी एकरकमी  आणि गेल्या हंगामातील दुस्रया हफ्ताच्या मागणीचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. थकीत ऊसबिलाच्या लढाईच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बनपुरीमध्ये मेळावा पार पडला. भवानीदेवीच्या मंदिरातील या मेळाव्याला खटाव तालुक्यातील बनपुरी, गुरसाळे, गोपूज,अंबवडे, पिंपरी, चितळी, विखळे, कानकात्रे सह उसपट्टा असलेल्या अनेक गावातील उसउत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.यावेळी जरंडेश्वर, केनऍग्रो, गोपूजचा ग्रीन पॉवर आणी वर्धन शुगरअनेक ऊसउत्पादक शेतकर्यांनी सर्वच कारखान्याच्या विरोधात तीव्र भूमिका मांडल्या. गाळप हंगाम सुरू होताना जिल्हाधिकारी आणी पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तातडीने एकरकमी द्यावी आणि मागील हंगामातील थकबाकी  द्यावी अन्यथा  प्रजासत्ताकदिनापासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी अनेक वक्त्यांनी दिला. यावेळी  खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून उपस्थित शेतकयांशी संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत एफआरपीची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही. कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी राहील, असे आश्वासन खासदार शेट्टी यांनी यावेळी दिलं. पुण्यातील साखर आयक्त कार्यालयावरील 28 तारखेच्या मोर्चाला खटावमधील ऊसउत्पादक शेतकयांनी  मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही खासदार शेट्टी यांनी केले. प्रजाकसत्ताकदिनाच्या लढाईला पाठबळ देण्याआठी 26 जानेवारीला स्वाभिमानीचे प्रदेशअध्यक्ष रविकांत तुपकर खटाव दौयावर येणार आहेत.यावेळी गोपूजमध्ये ऊस उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली. मागील थकबाकी न देणाया साखर कारखानदारांच्या मालकांच्या बंगल्यासमोर आंदोलने सुरू करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी नाना पुजारी, ऍड प्रमोद देवकर, सविता देवकर, दत्तूकाका घार्गे, अजित पवार, सचिन पवार, दत्तात्रय पवार,  विनोद देशमुख यांच्यासह अनेक स्वाभिमानाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शेतकरी चळवळी साठी सातत्यान लेखनीद्वारे आक्रमक भूमिका मांडणाया तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी धनंजय क्षिरसागर यांचा सत्कार करण्यात आला.फोटो ओळी : बनपुरी येथे आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी झालेली शेतकयांची बैठक 

Related posts: