|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पद्मविभूषण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पद्मविभूषण 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या यादीनुसार 4 जणांना पद्मविभूषण, 14 जणांना पद्मभूषण आणि 94 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह लोकगायिका तीजम बाई, ईस्माईल ओमर गुल्लेह (विदेशी) आणि अनिलकुमार मणिभाई नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱया या पुरस्कारांसाठी यंदा 112 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 21 महिलांचा आणि एका तृतीयपंथियाचा समावेश आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्यानंतर राष्ट्रपती भवनमधून पुरस्कार विजेत्यांची अधिकृत यादी जारी करण्यात आली. अन्य पद्म विजेत्यांमध्ये क्रिकेटपटू गौतम गंभीर, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर (मरणोत्तर), भारतीय नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा, अभिनेता कादर खान (मरणोत्तर) यांचा पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. तसेच बचेंद्री पाल यांचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून पद्म पुरस्काराने गौरविले जाते. 

14 जणांना पद्मभूषण

देशातील तिसऱया क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱया पद्मभूषण पुरस्कारासाठी 14 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जॉन चेंबर्स, सुखदेव सिंग धिंडसा, प्रवीण गोर्धन, महाशय धरमपाल गुलटी, अशोक लक्ष्मणराव कुकडे, करिया मुंडा, बुधदित्य मुखर्जी, मोहनलाल विश्वनाथन नायर, एस. नंबी नारायण, कुलदीप नायर (मरणोत्तर), बचेंद्री पाल, व्ही. के. शुंघलू, हुकुमदेव नारायण यादव आदींचा समावेश आहे.

Related posts: