|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » मोदी तामिळनाडू दौऱयाला विरोध, ट्विटरवर ट्रेंट होतोय हॅशटॅग

मोदी तामिळनाडू दौऱयाला विरोध, ट्विटरवर ट्रेंट होतोय हॅशटॅग 

ऑनलाईन टीम / मदुराई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराई दौऱयावर जात आहेत. येथे ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यासाठी मोदी थोप्पुरला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. हजारो नेटीझन्सकडून ट्विटवरुन मोदींविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

तामिळनाडूतील मोदींच्या दौऱयाला काही स्थानिक नागरिक, विरोधी पक्षातील पुढारी आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे, मोदींना ट्विटरवरुनच गो बॅक असे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर गेल्या 12 तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग टेंडिंगमध्ये आहे. थुटुकुंडी येथील पोलिसांचा गोळीबार, गाजा रिलिफ फंड याबाबत मोदींना प्रश्न विचारण्यात येत आहेत. शनिवारी सायंकाळी या टेंडला सुरुवात झाली असून रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत 2.50 लाख ट्विपल्सने हा हॅशटॅग ठेऊन मोदींच्या दौऱयाला आपला विरोध दर्शवला आहे. यापूर्वीही एप्रिल 2018 मध्ये मोदी तामिळनाडूच्या दौऱयावर असताना अशाचा विरोधाचा सामना मोदींना करावा लागला होता. त्यावेळीही विरोधकर्ते काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, गो बॅक मोदी हा हॅशटॅग टेंड झाल्यानंतर, मोदी समर्थकांनीही #TNWelcomesModi असा टेंड ट्विटरवर सुरू केला असून तोही #GoBackModi च्या खालोखाल टेंड करत आहे.

Related posts: