|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिक पटेल विवाह बंधनात

हार्दिक पटेल विवाह बंधनात 

अहमदाबाद / वृत्तसंस्था

पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारा गुजरातचा नेता हार्दिक पटेल रविवारी विवाह बंधनात अडकला. आपली बालपणीची मैत्रिण किंजल पारिख सोबत त्याने विवाह केला आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिह्यातील दिगसार गावात काही निवडक नातलगांच्या उपस्थितीत एका मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. किंजल पारीख ही विरामगाव जिह्यातील असून तिचे कुटुंब सुरत येथे वास्तव्यास आहे. ती नुकतीच पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सध्या ती वकिलीचा अभ्यास करत आहे.