|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ब्राझीलमध्ये धरण फुटून 40 ठार

ब्राझीलमध्ये धरण फुटून 40 ठार 

300 हून अधिक बेपत्ता : चिखलात अनेक लोक गाडल्याची शक्यता

बुमाडिन्हो / वृत्तसंस्था

ब्राझीलमधील खाणीजवळचे धरण फुटून अनेक लोक चिखलाखाली गाडले गेले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. तसेच जवळपासची गावे पाणी आणि चिखलाखाली गेल्यामुळे 300 हून अधिक लोक बेपत्ता झाले असल्याचे सांगण्यात आले. मेनस जेराईस राज्यात ब्रुमाडिन्हो शहराबाहेर ही दुर्घटना घडली आहे. मदत व बचाव पथकाने चिखलात अडकलेल्या अनेक जणांची सुखरूप सुटका केली आहे.

ब्रुमाडिन्हो धरण तुटल्यामुळे मेनस जेराईस राज्यातील अनेक गावात चिखल साचला आहे. आपत्तीग्रस्त गावांतील लोकांच्या मदतीसाठी विशेष पाठवण्यात आली आहेत, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या धरणाशेजारी ब्राझीलमधील ‘वेल’ या कंपनीची खाण होती. धरण फुटल्यानंतर वेल कंपनीतील मजूर दुपारचे जेवण करत होते. धरणफुटीमुळे तयार झालेल्या चिखलात हे सर्व मजूर वाहून गेल्याचे सांगण्यात आले. या राज्यात 3 वर्षांपूर्वी धरणफुटीमुळे 19 जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या वषी सप्टेंबरमध्ये या धरणाच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली होती आणि धरण सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले होते. जवळच्या लोह खाणीच्या सफाईसाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जात होता. 1976 मध्ये तयार करण्यात आलेल्या या धरणाची क्षमता 20 लाख क्मयुबिक मीटर होती. पण तो फुटल्यामुळे त्यातून किती चिखल बाहेर पडला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Related posts: