|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सोशल मीडिया वापरामुळे कौटुंबिक जीवनाला धोका

सोशल मीडिया वापरामुळे कौटुंबिक जीवनाला धोका 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

सोशल मीडियाचा वापर आजकाल इतका वाढला आहे की त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबासाठी हा वापर धोकादायक असून पारिवारिक सुख बाधित होऊ शकते. यासाठी सावधानतेची गरज आहे, असे प्रतिपादन रोटे. डॉ. वासुदेव देशिंगकर यांनी केले. सध्या डॉक्टर्स हे सॉफ्ट टार्गेट आहेत. अतिशय सावधपणे वैधकीय सेवा करण्याची गरज आहे. अति कमाईच्या लोभापोटी डॉक्टरांनी चुकीच्या मार्गांचा अवलंब न करता प्रामाणिकपणे आणि तणावपूर्ण न राहता सेवा करण्याची गरज निर्माण झाली असून वाम मार्गाने पैसे कमावू नयेत, असा सल्ला ही देशिंगकर यांनी दिला.

येथील मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘जीवन गौरव’ आणि ‘आरोग्य मित्र’ पुरस्कार 2019 सोहळा पार पडला. हा सोहळा सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाटय़गृहात संपन्न झाला. उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी डॉ. देशिंगकर बोलत होते.

वैद्यकीय सेवा काल, आज आणि उद्या या विषयावर बोलताना डॉ. नाटेकर म्हणाले, तरुण डॉक्टरनी आत्ताच्या जगात प्रामाणिकपणे सेवा करावी. वैद्यांनाही आपले कौटुंबिक आणि सामाजिक जीवन आहे. याची जाणीव ठेवून जनतेची काळजी घ्यावी, असा मौलिक सल्लाही दिला.

येथील जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या मार्फत डॉ. सुरेश पाटील आणि डॉ. सुभाष पाटील या धन्वंतरीना जीवन गौरव पुरस्काराने आणि त्याचबरोबर आरोग्य मित्र पुरस्काराने रोटरी क्लब ऑफ शिरोळला सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष संजय गावडे आणि त्यांचे सहकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. सांगलीचे डॉ. श्रीनिवास नाटेकर, आणि कोल्हापुरचे रोटे. वासुदेव देशिंगकर यांच्या हस्ते गौरवमूर्तीना सन्मानित करण्यात आले.

स्वागत आयएमए अध्यक्ष डॉ. अतुल घोडके यांनी केले. प्रास्ताविक जे.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल यांनी केले. परिचय डॉ. सुनील चिपरीकर, डॉ. विनायक पत्की यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. जयश्री आवळेकर, डॉ. स्मिता चौधरी यांनी केले.

डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. ए. एस. पाटील, डॉ. चिदानंद आवळेकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. अभि खटावकर, डॉ. सुभाष अडदांडे, डॉ. कुगे, डॉ. बी. ए. शिखरे, यांच्यासह धन्वंतरी मोठय़ा संख्येने तसेच रोटे. नंदू बलदवा, रोटे. राजेंद्र पाटील, राजेंद्र नांद्रेकर, राजू झेले, प्रकाश झेले, पराग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील, डॉ. उर्मिला देसाई यांनी केले. आभार डॉ. सचिन ऐनापुरे यांनी मानले.

 

Related posts: