|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हस्तकला महामंडळाकडून स्थानिक हस्तकारागिरांना उर्बा देण्याचे कार्य

हस्तकला महामंडळाकडून स्थानिक हस्तकारागिरांना उर्बा देण्याचे कार्य 

श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन डिचोलीत हस्तकला महामंडळाच्या अपरांत मांडचे उदघाटन

डिचोली

 गोव्यातील कलेला व सांस्कृतिक परंपरेल संपूर्ण भारतात मान असून गोव्याबाहेर गोमंतकीय कलेच्या प्रदर्शनाला सदैव देशभरातील लोक उचलून धरतात. मात्र आजची पिढी या आपल्या परंपरागत कलेकडे दुर्लक्ष करताना दिसत नाही सल्याने गोमंतकीय संस्कृती व अला लुप्त होण्याची भिती आहे. अशा परिस्थितीत हि कला व परंपरा आजच्या युवा पिढीने आपल्या अंगात बिंबवेन ती सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. आमची कला म्हणजेच आमची खरी ओळख असून या कलाकारांना उर्बा देण्याचे काम हस्तकला महामंडळ करीत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले.

   डिचोली येथील शेटय़े पार्क येथे गोवा राज्य हस्तकला महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अपरांत मांड या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना ख सद र श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती डॉ. प्रमोद सावंत, हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश पाटणेकर, जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़?, डिचोलीचे नगराध्यक्ष सतीश गावकर, मुख्याधिकारी विवेक नाईक, महामंडळाचे व्यवस्थापक संतोष साळकर, संचालक गौरीश कुर्डीकर, कुडचडेचे नगराध्यक्ष फेलिक्स फर्ना?डिस, रमाकांत शेटय़? व इतरांची उपस्थिती होती.

   आपल्या हस्तकारागिरीला वाव मिळवून देण्यासाठी प्रत्येक कलाकाराने अशा प्रकारच्या प्रदर्शन विक्री कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. लोकांपर्यंत आपली परंपरागत कला पोहोचविण्याच्या हेतूने आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे, असेही यावेळी खासदार श्रीपाद नाईक यांनी म्हटले.

  यावेळी सभापती डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात, राज्य हस्तकला महामंडळ हे या राज्यातील हस्तकला आजही सांभाळून ठेवलेल्या कलाकारांसाठी आहे. मात्र प्रत्येक कारागिराने आपण तयार करीत असलेल्या उत्पादनाला बाजारपेठ कशा पध्दतीने मिळणार यावर स्वतः जास्त लक्ष द्यावे. आपले कला कौशल्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यास योग्य व प्रभावी बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वतः प्रयत्न करावे. तसेच आपल्या तयार केलेल्या वस्तू हस्तकला महामंडळाकडे कशा प्रकारे पोहोचणार यावरही अभ्यास करावा. असे आवाहन केले.

   आपल्या स्वागतपर भाषणात आमदार राजेश पाटणेकर यांनी या महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देताना हे महामंडळ पुर्णपणे गोव्यातील लोकांना व त्यांच्या कलेला पुढे आणण्याचे काम करीत आहज. अशा प्रकारच्या अपरांत मांड कार्यक्रमातून कलाकार तसेच हस्तकारागिरांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी मिळते. अशा संधीतून त्यांना पुढे चांगली बाजारपेठही मिळालेली आहे. असे म्हटले.

   समई प्रज्वलित करून या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन राजन कडकडे यांनी केले तर आभार संतोष साळकर यांनी मानले. त्यानंतर फुगडी स्पर्धा घेण्यात आली.

  दुसऱया दुवशी म्हणजे आज सोम. दि. 28 रोजी संध्याकाळी 100 कलाकारांचा सत्कार व त्यानंतर खास आफ्रिकन डान्स सादर होणार आहे.

तिसऱया दिवशी मंगळवारी दि. 29 रोजी ख्यातनाम गायक सुदेश भोसले यांचा गायनाचा व मिमिक्रीचा कार्यक्रम होणार असून ते या महोत्सवाचे खास आकर्षण असेल. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

Related posts: