|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजनाबाबत आज फैसला

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजनाबाबत आज फैसला 

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

शासनाने निवडणुका आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कारण देऊन मार्च-एप्रिल महिन्यात गोव्याला दिलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती भारतीय ऑलिंपिक संघटनेला केली होती. आता याच पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा आणि गोव्याची या स्पर्धेबाबत तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता आज गोव्यात येत आहेत.

त्यांच्या समवेत गेम्स तांत्रिक समितीचे चेअरमन मुकेशकुमारही आज गोव्यात येत असून ते शासनाच्या अधिकाऱयांसमवेत चर्चा करतील. गोव्याला देण्यात आलेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक वेळी वेगवेगळय़ा कारणांनी पुढे ढकलण्यात शासन सफल झाले असून आता यावेळी नवीन तारीख आयएओकडून मिळण्याची शक्यता आहे.

आयएओचे राजीव मेहता व मुकेशकुमार हे आज सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, क्रीडामंत्री बाबू आजगांवर, राज्याचे मुख्य सचिव, गोवा ऑलिंपिक संघटना तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱयांसमवेतही चर्चा करेल. त्यानंतर आयओएचे अधिकारी केंद्रीय मंत्री आणि गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्याशीही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भातील तयारीचा आढावा घेतील.

 

Related posts: