|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » पिंपरीत मारहाण केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरीत मारहाण केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर थांबलेल्या तरूणाला आठ जणांच्या टोळक्मयाने जबर मारहाण केली. ही घटना पिंपरीतील गांधीनगर येथे घडली. तू भाई झालास का, थांब तुझी वाट लावतो असे म्हणत पुर्वीच्या भांडणाच्या रागातुन टोळक्मयाने तरुणाला मारहाण केली. या प्रकरणी वैभव हटांगळे याच्यासह आाठ आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकुल उर्फ कुणाल सुधीर वेताळ याने टोळक्मयाविरूद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घरकुल येथील रहिवासी वैभव हटांगळे (वय 21) याच्यासह आठ जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गांधीनगर येथील पीएम चेंबरमागे थांबवलेल्या निकुल वेताळ याच्याजवळ नऊजण आले. त्यांनी त्यास दमबाजी केली. पुर्वीच्या भांडणाचा राग मनात असल्याने वैभव हा आरोपी फियार्दीच्या अंगावर धावुन गेला. त्यावेळी आरडाओरडा करत फियार्दी तरूण तेथून पळत जाऊ लागला. त्यावेळी आरोपीच्या एका साथीदाराने पडलेला सिमेंट गट्टू उचलुन फियार्दीच्या पाठीवर मारला. त्यावेळी फियार्दी चक्कर येऊन खाली पडला. त्यावेळी आरोपीचे अन्य साथीदार तेथे आले. त्यांनी पाठीत सिमेंट गट्टूने मारले. तसेच लाथा बुक्मयांनी मारहाण केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related posts: