|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » गुजरातचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार

गुजरातचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

ऑनलाईन टीम /अहमदाबाद :

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपामध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी वाघेला यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुंबईत घोषणा होणार असल्याचेही म्हटले जात होते.

 शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं. ‘याबाबत पवारांशी चर्चा झाली, ही चांगली गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात जनतेच्या मुद्यांना वाचा फोडण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठाची गरज असतेच आणि कोणालाही अशा गोष्टीसाठी नाही म्हणू नये’, असं वाघेला म्हणाले.