|Saturday, January 25, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

पौष महिन्याबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक

बुध. दि. 23 ते  29 जानेवारी 2019

 पौष महिन्यातील शनिवार अथवा पुष्य नक्षत्रावर पिंपळ पूजन केल्यास आर्थिक समृद्धी येते असा अनेकांचा अनुभव आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा आवडता असलेला हा पौष मास आहे. त्यामुळे हा महिना अशुभ कसा मानता येईल. पौष मासाविषयी जे काही समज गैरसमज आहेत, त्यामागील कारण मीमांसा लोकांना माहीत असणे आवश्यक आहे. पण हे सारे संदर्भ त्या त्या काळाला अनुसरून असल्याने त्या काळी ते योग्य होते. पण हल्लीच्या काळात अशा गोष्टी मानणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यासारखे होईल. रेणुका देवी अवताराचा संदर्भही या महिन्याशी जोडला जातो. या पौष मासात एका विशिष्ट नक्षत्र, वार योगावर जर एखादे मूल जन्माला आले तर त्याच्यावर कुबेराची कृपा रहाते व त्याचे संपूर्ण आयुष्य सुखासमाधानात व ऐश्वर्यात जाते हे किती लोकांना माहीत आहे? पौष मासात लग्न, मुंज, वास्तुशांती वगैरे मंगलकार्ये का करीत नाहीत, त्यामागील पौराणिक संदर्भ काय आहेत याबाबत यापूर्वीही सविस्तर लेख दिलेले आहेत पण ते सर्वांना मिळाले असतील असे नाही. त्यामुळे थोडी सुधारणा करून तो लेख पुन्हा दिलेला आहे. काही समाजात तर या महिन्यात शुभ कार्याची बोलणीसुद्धा करीत नाहीत. महाभारतात याचा उल्लेख आहे. कौरव पांडव युद्धपर्वात याबाबतची सविस्तर माहिती आहे. महाभारत युद्ध सुरू झाल्यावर कौरव पांडवांकडील 18 अक्षौहिणी सैन्य मारले गेले. एका अक्षौहीणी सैन्य म्हणजे 21870 हत्ती. 21870 रथ, 65610 घोडेस्वार व एक लाख 9350 पायदळ इतकी सेना असे या युद्धात असंख्य रथी महारथी मारले गेले. त्यानंतर या वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी सती गेल्या. या सर्वाचा हिशोब पाहिल्यास कोटय़ावधीच्या आकडय़ात नरसंहाराची ही संख्या जाते. युद्धात मारले गेल्यामुळे या असंख्य लोकांच्या अतृप्त आत्म्यांचा आक्रोश चालू असतो. या भीषण नरसंहारामुळे साऱया सृष्टीवर एक प्रकारची उदासीनता आलेली असते व त्यामुळे सृष्टीवर उत्साह नसतो सुतकी वातावरण असते. अशा उदासीन वातावरणात लग्न, मुंज, वास्तू या सारख्या मंगलकार्यांचे आयोजन करणे कितपत व्यवहार्य होईल, असा विचार पूर्वीच्या लोकांनी केला असावा. म्हणूनच या महिन्यात लग्न,  मुंज वगैरे मंगलकार्ये करीत नसावेत. असुरांच्या छळाने जगात सर्वत्र उच्छाद मांडलेला होता. देवादिकही भयभीत झाले होते. देवांचे देव महादेव यांच्या पुत्राच्या हातून या सर्व असुरांचा नाश होणार असे विधीलिखीत होते, पण महादेव वैराग्यपूर्ण अवस्थेत अखंड ध्यानात मग्न असल्याने त्यांच्या मनात प्रेमभावना जागृत करण्याची जबाबदारी मदनावर सोपविण्यात आली. त्याने शंकरावर आपला मदनबाण सोडताच महादेवाचा तपोभंग झाला. त्यामुळे क्रोधाने आपला तिसरा डोळा उघडून त्यानी मदनाला भस्म केले. त्यामुळे जगाची उत्पत्ती काही काळ थांबली. ही घटनाही पौष महिन्यातच घडल्यामुळे पती-पत्नीत प्रेम राहील की नाही, वंशवृद्धी होईल की नाही, या आशंकेने लग्ने करीत नसावेत. आदिमाया रेणुकादेवी हिला सुद्धा याच महिन्यात वैधव्य आले होते. त्यामुळे पौष पौर्णिमेपर्यंत देवीची ओटी भरणे व कंकण अर्पण करणे वर्ज्य करतात व शाकंभरी पौर्णिमेपासून कंकण भरणे, ओटी भरणे वगैरे देवीपूजेचे कार्यक्रमही पूर्ववत सुरू होतात. यासाठी पौष महिना कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला अशुभ समजू नये. कोणतीही शुभ कार्ये या महिन्यात करता येतात.

 

मेष

रवि, बुध, केतू दशमात आहेत. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. फॅशनेबल वस्तुंच्या व्यवहारात मोठे यश देईल. घरादारासंदर्भातील कामांना गती मिळेल. नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी येतील. वाहन दुर्घटना, आजार-अपघात यादृष्टीने त्रासदायक. माता-पित्यांचे मन दुखवेल असा कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात काही महत्त्वाच्या घटना घडतील.


वृषभ

भाग्यातील त्रिग्रह युतीमुळे अचानक अनाकलनीय घटना घडण्याची शक्मयता असते. बस अथवा रेल्वेगाडीतून जाताना नको ते प्रकार करू नका. जत्रा, यात्रा अशा जागी सर्व दृष्टीने जपावे लागेल. प्रवास, दगदग त्यामुळे मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहारात यश मिळेल.


मिथुन

धनलाभ तसेच वैवाहिक जीवनाशी संबंधित शुभ घटना घडतील. अचानक उद्भवणाऱया अडचणींमुळे प्रत्येक कामात विलंबाने यश, प्रवासात धोका अथवा वाहन बिघडणे असे अनुभव येतील. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ. कर्ज देणी घेणी या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. शत्रुच्या कारवायावर लक्ष ठेवावे. व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाचे फेरबदल.


कर्क

आर्थिक बाबतीत सप्ताह उत्साहवर्धक आहे. सतत कोणत्या  ना कोणत्या मार्गाने पैसे मिळत राहतील. वैरत्व, मतभेद टाळावेत. वास्तुसंदर्भात महत्त्वाच्या घटना. कपटी व्यक्तीमुळे मनस्ताप. ऐनवेळी संततीविषयक बाबीसाठी दिवस खर्ची पडेल. काहीजणांनी अचानक पाठ दाखविल्याने महत्त्वाच्या कामात अडथळे. दि. 24 वैवाहिक जीवन, भागीदारी व्यवसायाच्या बाबतीत विचित्र पेचप्रसंग.


सिंह

महत्त्वाच्या कामासाठी स्वत:च धावपळ करावी लागेल. जागा, दुकान, फ्लॅट व वास्तुसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्याल. बंद पडलेल्या व्यवहारात चांगले यश, अति कष्टामुळे आरोग्याच्या तक्रारी तसेच शत्रुपीडा, वैवाहिक जीवनात काही बाबतीत टोकाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक व्यवहारासाठी धावपळ, कर्जप्रकरणे होतील.


कन्या

प्रवासात व लिखाणात यश मिळेल. ऐनवेळी कुणाला तरी मदत करावी लागेल. पण आपणहून कुणाच्या भानगडीत पडू नका. घरगुती बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्याल. संततीविषयक चिंता सतावतील. प्रति÷ा, मानसन्मान या बाबतीत संस्मरणीय घटना. व्यवहारामुळे इतर कामात लक्ष देणे जमणार नाही. देवधर्म अध्यात्माच्या कामात यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.


तूळ

या सप्ताहात गोड बोलूनच कामे करून घ्यावी लागतील. रागाच्या भरात कुणाला  कोठेही चुकूनही वाईट बोलू नका. अन्यथा होणारी कामेही फिसकटतील. प्रवास जपून करावेत, अथवा टाळावेत. कुणाशी नवीन आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करू नका. भावनेच्या भरात कुणालाही वचन देऊ नका, ते अंगलट येईल.


वृश्चिक

रवि, गुरुचे चांगले पाठबळ मिळणार असून आर्थिक आवक वाढणार आहे, पण खर्चही वाढतील. दुसऱयांचे वाहन वापरत असाल तर काळजी घ्या. अति दूरवरचे प्रवास तसेच आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. तोंडी व्यवहार करणार असाल तर शब्दात अडकणार नाही याची काळजी घ्या. नको ते धाडस करण्याचे टाळा. या सप्ताहापासून सर्वाविषयी चांगला भाव ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समस्या आपोआप मिटत जातील.


धनु

आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी येतील. नवे व्यवहार यशस्वी होतील. जागा अथवा घराच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल. भांडण, तंटे, डोके भडकणे, अति विचार, शत्रुत्व वाढविणे अशा प्रकारांपासून दूर रहा. कुणाच्या तरी प्रकरणात अडकल्याने कोर्टप्रकरणे उद्भवतील. सावध रहा. या सप्ताहात जर काही विपरीत घटना घडल्यास स्वत:ची चूक कारणीभूत असेल. आर्थिकदृष्टय़ा हा आठवडा समाधानकारक जाईल.


मकर

लाभस्थानी गुरु. कितीही अवघड कामे असले तरी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हे स्थान या दोन्ही ग्रहांना शुभ आहे. त्यामुळे विरोध वाढला तरी मोठे यशही मिळवाल. काही अडलेली कामे मार्गस्थ होतील. सट्टा, व्यापार, शेअर मार्केट यात चांगले लाभ संभवतात. तातडीने महत्त्वाची कामे करून घ्यावीत. वास्तुशास्त्र व तत्सम प्रकारामागे लागल्याने आर्थिक नुकसान.


कुंभ

काहीवेळा सुईने जे काम होते ते दाभणाने होत नाही, याचा अनुभव या आठवडय़ात येईल. स्वस्त मिळाले म्हणून फर्निचर, गाडी व तत्सम जुन्या पुराण्या वस्तू खरेदी कराल. नको ते प्रकार केल्याने वास्तुदोष व प्रखर बाधा निर्माण होईल. कुणी कितीही रडवा चेहरा केला तरी त्याला मदत करताना काळजी घ्यावी. आर्थिक दृष्टय़ा चांगले योग आहेत.


मीन

इतरांना मदत करावी पण त्यात आपण कुठे अडकणार नाही याचीही काळजी घ्यावी. हे हा महिना सुचवीत आहे. नवे काहीतरी करून दाखविण्याचे धाडस करावेसे वाटेल, पण अंगच्या कलागुणांना चांगले यश मिळेल. पैसाअडका, मानसन्मान, वाहन, घरदार या सर्व बाबतीत अनुकूल योग. पण  नको ते स्टंट व इतर धोक्मयापासून जपा.

Related posts: