|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांना काव्यप्रेमी भरारी पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांना काव्यप्रेमी भरारी पुरस्कार जाहीर 

कोल्हापूर

        व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय ‘काव्यप्रेमी भरारी पुरस्कार’ हा ठाणे येथील ज्येष्ठ कवी, लेखक व पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा नवापूर (जि. नंदुरबार) येथील राज्यस्तरीय काव्यमहोत्सवात 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

          तोरस्कर हे राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावचे सुपुत्र आहेत. ते काव्यप्रेमी शिक्षक मंचचे मुंबई जिल्हा अध्यक्ष असून नक्षत्राचं देणं काव्यमंचचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांचे ‘प्रीतफुले’ व ‘वाळवंटातील झरे’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Related posts: