|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोळंब-न्हिवे-आडारी रस्त्यावर तिघे दुचाकीस्वार जखमी

कोळंब-न्हिवे-आडारी रस्त्यावर तिघे दुचाकीस्वार जखमी 

वार्ताहर / मालवण:

कोळंब पूल दुरुस्तीसाठी बंद झाल्याने ग्रामस्थांसाठी कोळंब-न्हिवे-आडारी या पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु या मार्गावरून जाताना तिघे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. सोमवारी माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर कोळंब-न्हिवे-आडारी या रस्त्याने दुचाकीने जात असताना रस्त्यावर पडले. त्यानंतर याच रस्त्यावरून दुचाकीने जात असताना तेजस न्हिवेकर व एक ग्रामस्थ जखमी झाला. दरम्यान, बांधकाम विभागाने अद्यापही पर्यायी रस्त्याची दुरुस्ती न केल्याने माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर यांनी बांधकाम विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Related posts: