|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाठपुराव्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार: अभय मंनकुदळे

पाठपुराव्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार: अभय मंनकुदळे 

वार्ताहर /शिखरशिंगणापूर :

अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून शिखरशिंगणापूर प्रसिद्ध आहे, मात्र येथे रुग्णांच्या उपचारची सोय नसल्याने गेले कित्येक दिवस रुग्णांची गैरसोय होत होती. जिल्हा परिषद नियोजन फंडातून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांनी सव्वादोन कोटींचा भरीव निधींची उपलब्धता करून दिल्याने येथे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहते आहे. याबाबत शिंगणापूर ग्रामपंचायतीने अखेरच्या क्षणापर्यंत पाठपुरावा केल्याची माहिती सरपंच अभय मेंनकुदळे व उपसरपंच शंकर तांबवे यांनी दिली.

  शिंगणापूरमध्ये प्रतिवर्षी 10 ते 15 लाख यात्रेकरू भाविकभक्त येत असतात, परिसरामध्ये जवळपास 30 कि.मी अंतराच्या आत रुग्णांच्या उपचाराची सोय नसल्याने गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करुन निधीची उपलब्धता केली आहे. वीज उपकेंद्राशेजारी ग्रामपंचयत मालकी जागेमध्ये 40 रुग्ण उपचार सुविधा, दोन मोठे जनरल वार्ड, दोन निवासी आरोग्य अधिकारी, दोन निवासी आरोग्य सहायक, शस्त्रक्रिया उपचारसुविधा, विविध प्रकारच्या तपासणी सुविधा, दोन रुग्णवाहिका, त्याअनुषंगाने रुग्णसेवक व कर्मचारी अशी नियुक्ती याठिकाणी केली आहे. आरोग्य विभागाने चैत्र वार्षिक यात्रेपूर्वी पदनियुक्ती करावी. याबाबत शिंगणापूर ग्रामपंचयतीने सर्व लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हापरीषद मुख्यकार्यकारी आधिकारी, मुबंई आरोग्य विभाग मंत्रालय, ठिकाणी पाठविल्या आहेत. यावर त्वरित कार्यवाही करून पदभरती केल्यास अंतिम टप्प्यातील हॉस्पिटल शिंगणापूर वार्षिकचैत्री यात्रेपूर्वी सुरू होऊ शकेल. तसेच शासनदरबारी अडकून पडलेल्या पदभरती प्रस्तावकामी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थामधून होत आहे.

Related posts: