|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बालकल्याण संकुलात महात्मा गांधी पुण्यतिथी

बालकल्याण संकुलात महात्मा गांधी पुण्यतिथी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्यावतीने बुधवारी बालकल्याण संकुलात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर, मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिपुरकर यांनी महान नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा त्यांचे आचार, विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे सांगितले. यावेळी अधिक्षक पी. के. डवरी, कांचन हेब्बाळकर, पद्मजा गारे, दौपदी पाटील, सचिन माने, टी. एम. कदम, नजिरा नदाफ, स्मिता वायचळ, कर्मचारी उपस्थित होते.